अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
दया धर्म शांतीच्या पथाचा
पथिक तुझा तूच हो
तू स्वयं दीप हो
अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
कोसळोत वर्षा उठू दे झंझावात
आसूढ विजेचे घेउनिया निमिषात
धावू दे दिशांना करुनिया आकांत
पण निश्चल असू दे ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे
सूर्या चे रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
मानव्य जपाया हो तू मानव आधी
तेवता जळू दे आसक्तीची व्याधी
बोधिसत्व फुलुदे तुझिया ओठा वरती
निथळू दे तयातून सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो
सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो
अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
तू जळणारांचे हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे सोड सुखाचा संग
जळताना दे तू मंत्र जगा जळण्याचा
दुक्खाच्या तिमिरा सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे
तूच मूर्त रूप हो
तू स्वयं
दीप हो
अत्त दीप भवं – स्वयं दीप हो
गीत कुणी गायिले व संगीतकार कोण आहेत ?
ReplyDeleteSinger - Jaywant kulkarni
Delete