Sunday, March 23, 2014

वैर जिंकावे प्रेमाने



वैर जिंकावे प्रेमाने
युद्धाने वाढते युद्ध
शाक्य-कोलीया संघर्षीते
वदले गौतम बुद्ध

नदी रोहिणी पाण्यासाठी
वाद तो शाक्यांचा
संघ घेई मग बहुमताने
निर्णय युद्धाचा
हिंसाकारक त्यांच्या मतांना
गौतम करी विरोध
शाक्य-कोलीया संघर्षीते
वदले गौतम बुद्ध
वैर जिंकावे प्रेमाने
युद्धाने वाढते युद्ध

संघाचा तो नियम मोडता
भोगी स्वतः शिक्षा
वचनासाठी घेती शांतीने
परीव्र्जा दीक्षा
सर्व सुखाचा त्याग करुनी
सत्य केले सिद्ध
शाक्य-कोलीया संघर्षीते
वदले गौतम बुद्ध
वैर जिंकावे प्रेमाने
युद्धाने वाढते युद्ध

मानव दुक्ख हराया केली
घोर तपस्या वनी
ज्ञानसूर्य हा देई जगाला
धम्म खरा जीवनी
सत्य अहिंसा आणि शांतीचा
करुनिया बोध
शाक्य-कोलीया संघर्षीते
वदले गौतम बुद्ध
वैर जिंकावे प्रेमाने

युद्धाने वाढते युद्ध
--------------------------------------------ooo-------------------------------------------- 

No comments:

Post a Comment