Saturday, March 22, 2014

आरती बाबासाहेबांची

आरती बाबासाहेबांची
                                                                   ------ कवी: मंगेश पाडगांवकर
                                                                -----गायक: शरद जांभेकर 


जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

रुढींची राक्षसीन घालीतसे धाक
तूच दिली दुबळ्यांना लढण्याची हाक
तू धरिला समतेचा धगधगता पलिता
तू धरिला समतेचा धगधगता पलिता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

माणसास हीन म्हणे तो नाही धर्म
माणसास दूर करी ते पापी कर्म
बुद्धाच्या करुणेचा तू नव उद्गाता
बुद्धाच्या करुणेचा तू नव उद्गाता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

घडल्यावर दिनावर जुल्म जगी कोटे
नाव तुझे घेताक्षणी आग उरी पेटे
कुणी न हीन कुणी न क्षुद्र उन्नत हा माथा
कुणी न हीन कुणी न क्षुद्र उन्नत हा माथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

लाख लाख हृदयातून दाटुनी ये भक्ती
शब्द तुझे मंत्र आम्हा स्मरण तुझे शक्ती
प्रेरक तू तारक तू मुक्ती चा नेता
प्रेरक तू तारक तू मुक्ती चा नेता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
माणुसकीच्या देवा तू अमुचा त्राता
जय भीम जय भीम दलितांच्या नाथा

जय भीम जय भीम दलितांच्या नाथा
---------------------------------------------ooo-------------------------------------------------

1 comment:

  1. बाबासाहेबांची आरती बनवुन की त्यांना देव बनवायचे आहे का.
    बंद करा हे थोतांड सगळे.
    सगळे देव संपलेत काय तुमचे ३३ कोटीपैकी. जे आमच्या युपगपुरूषावर आरती बनवताय

    ReplyDelete